मख़दूम समाचार
अहमदनगर (विजय मते) २८.६.२०२३
आपला भारत देश हा विविध संस्कृती आणि परंपरेचे नटलेला आहे. आपले सण हे एकता दर्शवितात. गणेशोत्सव, दिवाळी, होळी, ईद, नाताळ हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक सणाच्या मागे धार्मिक महत्व आहे. भारतीय संस्कृतीत सण, उत्सव परंपरा जोपासायची असेल तर हे संस्कार बालवयातच दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन तहसिलदार सुनिता काळे यांनी केले.
वसंत टेकडी येथील श्रीनाथ विद्या मंदिर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी दिंडी काढली होती. यावेळी तहसिलदार सुनिता काळे, संतोष काळे, प्राचार्य भरत बिडवे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, एम.एन.यन्नम, ए.जी.चक्राल, श्रीमती एम.व्ही.ससे, डि.एस.बुधवंत तसेच पालक मोठ्या संख्येने आदि उपस्थित होते.
यावेळी काळे पुढे म्हणाल्या, श्रीनाथच्या बाल वारकर्यांनी दिंडीत पर्यावरणाचे महत्व, पाणी बचतीचे महत्व घोषवाक्यातून फलकावर तर लिहले पण या दिंडीतून सर्वांना आवाहन करीत विठ्ठलाच्या नामघोषाबरोबरच समाजाला एक चांगला संदेश दिला हे कौतुकास्पद आहे.
प्रारंभी संतोष काळे व सुनिता काळे यांनी पालखी पूजन केले. विविध संत, देव-देवतांच्या वेशभुषेत नटलेल्या बालकांचे औक्षण केले. या आषाढी दिंडीत बालवारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबरच पालकांचा मोठा उत्साह यावेळी दिसत होता. आपल्या पाल्यांवर शाळेतील होणारे संस्कार पाहून पालक देखील मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देतात. ही आषाढी दिंडी निर्मलनगर परिसरात फिरुन शिवनगर येथील सिद्धेश्वर मंदिरात आली. यावेळी बालचुमंचा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी देवस्थानच्यावतीने या बाल वारकर्यांना अल्पोपहार वाटून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
देवस्थानचे अध्यक्ष बी.एम.नागरे, बी.बी.आंधळे, व्ही.डी.कुताळ, आर.बी.बगाडे, एम.ए.पांदे, एम.ए.खेडकर, एम.व्ही.आंबिलवादे उपस्थित होते. या सर्वांचे मुख्याध्यापिका सिद्धम यांनी आभार मानले. दिंडी यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment