शाहू महाराजांनी भारताच्या आधुनिकतेचा पाया रचला - डॉ. राजेंद्र कुंभार; स्मायलिंग अस्मिता आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने राजर्षी शाहू जयंतीचे आयोजन !


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) २८.६.२०२३
     ब्रिटीशांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा अहमदनगरच्या किल्ल्यात कपटाने खून केला; त्यानंतर अतिशय कठीण काळात छत्रपती शाहू महाराज गादीवर आले. शाहू महाराजांनी न डगमगता पहिल्यांदा शिक्षण, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे प्रश्न, शेती आणि उद्योग या क्षेत्राकडे बहुमोल योगदान दिले. यासाठी स्वताच्या राज्याचा खजिना उपलब्ध करून दिला.आरक्षणाचा पहिला अध्यादेश काढून उपेक्षितांना शिक्षण आणि नोकरीत सामावून घेतले. ग्रंथालयांची मोठी चळवळ उभी केली. शेकडो शाळा महाविद्यालयाला आर्थिक मदत दिली. शेतीला पाणी मिळावे यासाठी राधानगरी धरणाचे काम सुरू केले सोबतच व्यापार उद्योग वाढीसाठी सुत गिरणी, कारखाने उभारले. मागासवर्गीय पैलवानांना सरदार तालीम उभारली. सांस्कृतिक दहशतवाद मोडीत काढून समतेचा आग्रह धरणारे थोर युगपुरुष छत्रपती शाहू महाराज जगात ब्रिटिश साम्राज्य मोठ्या उंचीवर असताना देखील भारताच्या आधुनिकतेची पाया भरणी करणारे पहिले राज्यकर्ते ठरले,असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मारक समिती आणि स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमास केले.
    दरम्यान डॉ. कुंभार यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून होत असलेल्या अभ्यासिकेला तब्बल २० हजार रुपयांची पुस्तके देत आहे असे जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेले शाहूप्रेमी अमोल गाडे म्हणाले की छत्रपती शाहू महाराजांचे आणि  अहमदनगरचे ऋणानुबंध फार घट्ट होते. त्यांनी अहमदनगरला भेटी दिल्या. मराठा बोर्डिंग सोबतच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उभारणीसाठी मोठी आर्थिक मदत केली.त्यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील अहमदनगरच्या शेतक-यांच्या मुलांसाठी ग्रंथालय व्हावे यासाठी भरीव निधी देत हे ऋणानुबंध जपले आहेत.
     कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल म्हणाले की खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शाहू महाराज जयंती होत नाही त्यामुळे नव्या पिढीला छत्रपती शाहू महाराज कळले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारने सुध्दा याबाबत कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जैद शेख यांनी केले कार्यक्रमाला बांधकाम व्यावसायिक धीरज कुमटकर, अजय शिंदे, अजिंक्य पवार, स्वप्निल लोखंडे, विशाल पवार आदींसह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा