प्रा. प्रकाश वाकळे यांना साहित्यभूषण पुरस्कार जाहीर; २९ जूनला होणार वितरण सोहळा !


मख़दूम समाचार 
परभणी (प्रतिनिधी) २७.६.२०२३
     येथील साहित्यिक तथा एकता फाउंडेशन, जिल्हा कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश वाकळे यांना नुकताच साहित्यभूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निळे प्रतीक या संस्थेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
       प्रा. वाकळे यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उल्लेखनीय योगदान पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  पुरस्काराचे वितरण ता.२९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद सांस्कृतिक सभागृहात संस्थेच्या वर्धापनदिन सोहळ्यात करण्यात येणार आहे.
    प्रा. प्रकाश वाकळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे अहमदनगर येथील वाकळे मंडळींनी त्यांचे हार्दीक अभिनंदन केले आहे.
   

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा