आदर्शगावचे क्रीडाशिक्षक दिपक ठाणगे यांचा शिवसेना क्रीडारत्न पुरस्काराने सन्मान !


मख़दूम समाचार 
नाशिक (प्रतिनिधी) २५.६.२०२३
     अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील क्रीडा शिक्षक दिपक ठाणगे यांचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन नाशिक येथे सन्मान करण्यात आला. आतापर्यंत उत्कृष्ट खेळाडू, आदर्श पंच, आदर्श मराठी शिक्षक तसेच कला, क्रिडा, संगीत, कृषि अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे यशवंत माध्यमिक विद्यालय हिवरेबाजार येथील दिपक मार्तण्ड ठाणगे यांचा नाशिक येथील शुभमंगल हॉल, आग्रा रोड पार पडलेल्या सत्कार समारंभामध्ये पालकमंत्री दादाजी भुसे,  सईद जलालुद्दीन रिझवी ऑलिंपियन, अर्जुन पुरस्कार विजेते यांच्या हस्ते क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    क्रीडा क्षेत्रात ते स्वतः कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, खो-खो चे उत्कृष्ट खेळाडू व पंच असून आज पर्यंत क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून वैयक्तिक क्रिडा स्पर्धा, कुस्ती, खोखो, कबड्डी खेळातून अनेक विद्यार्थ्यांना तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय स्तर, राज्यस्तरापर्यंत विद्यार्थ्यांना नेण्याचे कार्य दिपक ठाणगे यांनी केलेले आहे, या सर्व कामगिरीचा आलेख पाहून नाशिक जिल्हा शिवसेना क्रिडा विभाग यांच्याकडून उत्तर महाराष्ट्र क्रिडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
          नाशिक येथे क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल यशवंत कृषि ग्राम व पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.पोपट पवार, आदर्शगाव हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे, शोभा पवार, एस.टी पादीर, रो.ना.पादीर, सहदेव पवार, चेअरमन छबा ठाणगे, पै.जालिंदर चत्तर, विजय ठाणगे, पै. रावसाहेब चत्तर, शिवाजी ठाणगे, हबीब सय्यद, दत्ता पादीर, कृष्णा ठाणगे, गोपा ठाणगे, मुख्याध्यापक मुरलीधर अमृते, कैलास खैरे, नंदकुमार झावरे, निता सोनवणे तसेच सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी दिपक ठाणगे यांचे अभिनंदन केले. तसेच परिसरातून सर्व गुरुजन व शिक्षक बांधव अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा