बैंकिंग अर्थसहाय्यातून व्यावसायिक वृद्धीसाठीयोग्य कागदपत्रे आवश्यक - इंजि.मोहसिन शेख। मुस्लिम कॉ.ऑफ बैंकेच्यावतीने काकर समाज बांधवांना बैंकिंग मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न


मख़दूम समाचार
श्रीरामपूर (प्रतिनिधी) २५.६.२०२३
येथील मुस्लिम काॅ.ऑप. बैंक च्या वतीने मुस्लिम काकर समाज बांधवांना निमंत्रित करून बैंकिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शनपर एका छोटेखानी कार्यक्रमा चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वेळी बँकेचे मॅनेजर शकील कुरेशी यांनी बँकेच्या सर्व कार्यशैली विषयक सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक इब्राहिम शेख होते. समता कॉम्प्युटर इंस्टीटयूट चे संचालक इंजि.मोहसीन शौकत शेख यांनी सांगितले की,काकर समाज हा पुर्वीपासूनच सुयोग्य पद्धतीचा व्यावसायिक समाज आहे, आपल्या परिश्रमाद्वारे विविध व्यावसायातून या समाजाने स्वतःला प्रगत केले आहे, सुव्यावसायिक समाज असल्याकारणाने बैंकिंग क्षेत्राकडे वळल्यास अधिक सक्षमपणाने प्रगती शक्य आहे,याकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे शॉप एक्ट वैगरे असे सर्व उपयोगी कागदपत्रांविषयी त्यांनी यावेळी अचुक माहिती दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष इकबाल ईस्माईल काकर सर यांनी यशस्विरित्या केले. 
यावेळी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाइजेशन अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अन्वर तांबोळी यांचा सत्कार मुस्लिम बैंक व काकर समाजाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मुश्ताक तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,काकर समाज हा व्यापार व शिक्षणावर लक्ष्य केंद्रित करणारा असा समाज आहे,या समाजाने बैंकिंग क्षेत्रात देखील पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी युवक नेतृत्व कार्याध्यक्ष जावेद काकर, खजिनदार शरीफ काकर,हाफिज इरफ़ान काकर, करीम काकर,युनूस काकर,जुनेद काकर, रशीद काकर, अफसर काकर, खलील काकर, रहीम काकर, नजिर काकर, फारूक काकर सर, साबीर काकर, हुसैन काकर, जाफर काकर, रऊफ काकर, फिरोज काकर,अयाज काकर, शकील काकर, शाहरुख काकर, गुलाम साहब आदी उपस्थित होते.
वृत्तसंकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा