पॅलेट आर्ट प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सुरू; भारती विद्यापीठ कन्या प्रशालेच्या शाक्या मधुकर रामटेके यांच्या ५ चित्रांची निवड !


मख़दुम समाचार 
पुणे (प्रतिनिधी) २३.६.२०२३
    येथील स्टारविन्स गृप यांच्यावतीने सुरू असलेल्या ६ व्या पॅलेट आर्ट प्रदर्शनाचे काल दि.२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अभिनव कला महाविद्यालयाचे प्राचार्य राहूल बळवंत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी तृप्ती देधिया, रोहित नाथ, प्रमुख पाहुण्या अनु रघुनाथन, सिमा खान, पायल खोत, शाक्या रामटेके, मानस जोशी आदी उपस्थित होत्या.
     बालगंधर्व कलादालनात सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष असून दि. २२ ते २४ जून सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.  
प्रदर्शनासाठी भारती विद्यापीठ कन्या प्रशालेच्या शाक्या मधुकर रामटेके या इयत्ता ९ वी तील विद्यार्थीनीच्या ५ चित्रांची निवड झाली आहे. तिला कलाशिक्षका श्रध्दा कुमठेकर, वर्गशिक्षक वाघमोडे सर आणि मुख्याध्यापिका अलका लाड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असते.
     प्रदर्शनात अनेक महत्वाच्या चित्रकारांनी चितारलेले चित्र रसिकांसाठी पहाण्यास उपलब्ध आहेत. पुणे व परिसरातील अनेक कलाकार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
     कोणाचेही प्रायोजकत्व न घेता स्टारविंग्ज गृप सदस्य स्वबळावर २०१८ पासून गेली ५ वर्ष हे प्रदर्शन भरवित असल्याचे सांगितले.
     कला रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन चित्रकार शाक्या यांच्यासह स्टारविन्सगृपचे प्रणव तावरे, राज लोखंडे, प्रथमेश खर्गे, स्नेहा बुधकर, सुवर्णा चव्हाण, स्वरदा देवधर, प्रमेय झोरे यांनी केले आहे. स्टारविन्स गृपच्या अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट देणे - www.starwinsgroup.com






Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा