धनुर्विद्या खेलो इंडियाचे सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या - रेश्मा आठरेंची जिल्हा क्रिडाधिका-यांकडे मागणी; वाडिया पार्क संकुलामध्ये धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरमध्ये सुविधांचा अभाव !


मख़दूम समाचार
अहमदनगर (लहू दळवी) २.७.२०२३

     वाडिया पार्क संकुलामध्ये धनुर्विद्या खेलो इंडियाचे सेंटर असून मुलांना मुलभुत सुविधा नसल्याने हे सेंटर असून नसल्यासारखे आहे, सरकारने चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी खेलो इंडियाचे सेंटर अहमदनगरमध्ये सुरु केले आहे मात्र येथे खेळाडूंसाठी कोणत्याच सुविधा नाहीत. वाडिया पार्क संकुल येथे चालु असलेले धनुर्विद्या सेंटरमध्ये साध्या मुलभुत सुविधासुद्धा जिल्हाक्रिडा कार्यालयाव्दारे पुरविण्यात आलेल्या नाहीत. मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह त्याचप्रमाणे पावसापासून संरक्षणासाठी ओपन शेड नाहीतसेच खेलो इंडीयाचे शुटींगसाठीचे अंतर हे ५० मिटर व ७० मिटर असे प्रमाणित आहे परंतु या खेलो इंडीयाच्या सेंटर वर ७० मिटर रेंजसुध्दा नाही. त्यामुळे मुलांना स्पर्धेचा सराव करताना अडथळा होत आहे. त्याचप्रमाणे खेलो इंडीयाचे स्वतंत्र ऑफीससुध्दा नाही. खेळाडूंसाठी खेळाचे साहित्यसुध्दा नाही. दैनंदिन सरावावेळी वापरण्यात येणाऱ्या फेसफेसटीन व शासनाचे धनुष्यवान हे देखील देण्यात आलेले दिसून येत नाही.

    महाराष्ट्रामध्ये मंजूर ३ खेलो इंडीयापैकी आपले एक असूनही या सेंटरची क्रिडा विभागाच्या दुर्लक्षामुळे दयनिय अवस्था झालेली दिसून येत आहे. अहमदनगरच्या भुमीतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असूनसुध्दा या प्रशिक्षकांचा योग्य वापर जिल्हा क्रिडा विभागाला घेता येत नसल्यामुळे आपल्या शहरातील खेळाडू शासकीय सुविधा मिळत नसल्यामुळे धनुर्विद्या क्षेत्रामध्ये मागे पडत चाललेले दिसून येत आहे. तरी वाडिया पार्क संकुलामध्ये धनुर्विद्या खेलो इंडिया सेंटरमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी जिल्हा क्रिडा विभाग यांच्याकडे केली.

 यावेळी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, उषा सोनटक्के, लता गायकवाड, अलिशा गर्जे, अपूर्ण पालवे, शितल गाडे, सुनंदा कांबळे, रोहन शिरसाठ, अभिजीत खरपुडे, किरण घुले, ओंकार म्हसे, अभिजीत पानमळकर, शिवम कराळे, स्वप्निल शिंदे, नितीन लिगडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा