मख़दूम समाचार
परभणी (प्रतिनिधी) २.७.२०२३
राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाला संकटात सोडून राजकीय कुरघोड्या व लटपटी करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष, भाकपचे पुढारी कॉ. राजन क्षिरसागर यांनी चांगलेच खडसावले आहे. आज राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवारांसह अनेक आमदारांना भाजपाने उचलल्याने आपली प्रतिक्रीया देताना क्षिरसागर म्हणाले की, भाजपला सत्ता गमाविण्याच्या भयगंडाने ग्रासले आहे. १६ अपात्रतेची टांगती तलवार, कर्नाटक निकाल यातून वाट्टेल ती किंमत मोजून राष्ट्रवादीचे घोडे खरेदी केले जात महाराष्ट्रातील राजकारण कधी नव्हे इतक्या हलकट पातळीवर भाजपा ढकलत आहे.
ते पुढे म्हणाले की, सिंचन घोटाळ्याबद्दल आवई करणार्यांचा समेट महाराष्ट्राचे नुकसान करणारा आहे. जेसीबी मालकांची दोस्ती शेतकऱ्यांना उध्वस्त करणार आहे.
काल परवापर्यंत महात्मा फुल्यांची निंदा नालस्ती केल्याबद्दल आवाज उठविणारे त्याच भाजपच्या मांडीवर बसले आहेत.
पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ चोरण्याचा प्रकार घडणार आहे. विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचे हे संघ भाजपाचे कारस्थान लोकशाही व्यवस्थाच संकटात ढकलत आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष या खेळास जबाबदार असणाऱ्या भाजपा - राष्ट्रवादीचा कंपू यांचा धिक्कार करित आहे. महाराष्ट्रातील सुजाण जनता यातून निश्चितच महाराष्ट्रातील धोकेबाज व जनताद्रोही नेत्यांना धडा शिकवेल, असा इशारा शेतकरी नेते व भारतीय कम्युनिस्ट पक्षााचे पुढारी काॅम्रेड राजन क्षीरसागर यांनी दिला.
Post a Comment