मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १७.८.२०२३
सावेडी, भुतकरवाडी, बोल्हेगाव परिसरात बिबट्या दिसला असून पोलिस प्रशासनाने अशा बिबट्यापासून सावध रहाण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. बिबट्या हा खतरनाक असून लपून शिकार करत असतो. मुख्यत्वे गरीब प्राणी हे त्याचे शिकार होत असतात. गरीब बकरी, कुत्रे हे त्याचे सोपे खाद्य असते. बकरी, कुत्रे विरोध करत नसल्याने बिबट्या त्यावर गुजराण करीत असतो. बिबट्या हा ढोंगी असून लपून शिकार करण्यात तो वाकबगार असतो.
बिबट्यापासून सर्व नागरिकांनी तात्काळ सावध व्हावे म्हणून थेट पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी बिबट्या कुठे दिसल्यास सावध रहावे व प्रशासनास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment