देश सुटतो तेंव्हा : प्रीती छत्रे लिखित समकालीन प्रकाशनाचे नवे पुस्तक वाचायलाच हवे



मख़दूम समाचार
१९.८.२०२३

 समकालीन प्रकाशनाचे नवे पुस्तके नुकतेच बाजारात आले आहे. 'देश सुटतो तेंव्हा' या नावाने प्रीती छत्रे यांनी लिहलेले आहे.
     गेल्या दशकात अनेक देशांमध्ये गृहयुद्धं भडकली; गावांवर, शहरांवर बॉम्बहल्ले झाले. तर कुठे भीषण नैसर्गिक संकटे आली. तिथल्या माणसांना जीव वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यांनिशी देश सोडावा लागला आणि मग सुरू झाले एक नष्टचर्य.
     तापलेल्या वाळवंटातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीतून, दाट जंगलांतून, खवळलेल्या समुद्रातून माणसे जिवाच्या आकांताने निघाली. वाटेत किती मेली, परागंदा झाली याची गणतीच नव्हती. उरलेल्यांच्या वाट्याला रेफ्युजी कॅम्प्समधले किडा-मुंगीचे जिणे आले.
     आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतले लाखो लोक असे देशोधडीला लागले. या गोष्टी आहेत त्यांच्या ससेहोलपटीच्या. आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना सुरक्षित जगता यावे या साध्या इच्छेपोटी माणसाने सोसलेल्या अनन्वित हालअपेष्टांच्या, टोकाच्या परिस्थितीतही तग धरून राहण्याच्या आणि त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या सुद्धा.
     विश्वाला व्यापून असलेल्या रेफ्युजी प्रश्नाचा मानवी चेहरा समोर आणणारे हे  पुस्तक असून नक्कीच वाचले पाहिजे.
• पुस्तकाची मूळ किंमत - २०० रु/-
• सवलत किंमत  - १६० रु/- (फ्री घरपोच)
• पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क - 9370979287

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा