राजेश सरमाने यांचा BEST PRODUCTIVITY IMPROVMENT पुरस्काराने सन्मान !


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) १९.८.२०२३
    येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजेश सरमाने यांना नुकतेच  मानाच्या BEST PRODUCTIVITY IMPROVMENT या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ते इंडियन सिमलेस (किर्लोस्कर फेरस) येथे कार्यरत असून कंपनीच्या वतीने चांगली कामगिरी करणारास या पुरस्काराने गौरविण्यात येते.
    यावेळी सत्कार करताना कार्यकारी अधिकारी निशीकांत एकतारे, अहमदनगरचे प्रमुख चैतन्य शिंदे, पुणे येथील मानव संसाधन प्रमुख जाकीर शेख, कामगार संघटनेचे राजेंद्र वाकळे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
     राजेश सरमाने यांचे कामगार संघटना महासंघाने अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा