पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा

मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) २०.८.२०२३
    पोदार इंटरनॅशल स्कूल शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली. आज ७७ वा स्वातंत्र्यदिन पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. डेपो मॅनेजर इन महाराष्ट्र स्टेट रोड टुरिझम कॉर्पोरेशनच्या प्रियंका उन्हावणे व शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
      याप्रसंगी शाळेत सुंदर सजावट करण्यात आली होती. तिरंगा ध्वज आणि आणि तिरंगा पताकांनी शाळेचा परिसर सजवण्यात आला होता. विविधतेत एकता दाखवत शाळेतील विद्यार्थी संस्कृती शिंदे, दास्यभक्ती शेलार आणि प्रगती मांढरे यांनी भारतीय स्वातंत्र्याविषयी विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा विविध भाषात माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शहीद कॉम्रेड भगतसिंह, राजगुरू, लाला लजपतराय रॉय, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजीमहाराज अशा विविध भूमिका सादर करून नाटकातून देशाविषयी, देशभक्ती, देशप्रेम याची माहिती देत शाळेचे वातावरण देशप्रेमाने प्रफुल्लित केले. यावेळी  देशभक्तीपर गीते, समूह गाणी व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
        प्रियंका उन्हावणे यांनी विद्यार्थ्यांना संगितले की, भारताला अपघातमुक्त बनवण्याची तसेच माझी माती माझा देश याअंतर्गत पंचप्रण शपथ घेऊया. देशाचा विकास करूयात. यावेळी त्यांनी वाहतुकीचे नियम पाळा. हेल्मेटचा व सीट बेल्टचा वापर गाडी चालवताना करा, असे पालकांना आवाहन केले.
      यावेळी शाळेचे शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाल की, स्वात्रंत्र्य भारताचे नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी, सर्व नियमाचे पालन करत पार पाडूयात. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पालक, परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे पालक शाळेत उपस्थित राहू शकले नाही, अशा पालकांनी ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी वेदांत शिंदे आणि अनुष्का सांगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी प्रजेश पाटील याने केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा