वृक्षलागवडीसह संवर्धन काळाजी गरज - प्राचार्य आर.जे.बार्नबस; अहमदनगर महाविद्यालयात


मख़दूम समाचार
अहमदनगर (सा.सु.) १८.८.२०२३ 
   वसुंधरेवरील म्हणजे पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता या नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे. मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाचे नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमपर्वत व हिमनद्या वितळून लागल्या आहेत आणि त्यांच्या पाण्यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरणतज्ञांनी छोटी बेटे आणि समुद्राजवळील असलेला जगातील सर्व शहरांना धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी व भविष्यातील पिढीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करणे काळाची गरज आहे, असे  प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. बार्नबस यांनी केले.
    अहमदनगर कॉलेज मध्ये उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास मंडळ, ग्रीन क्लब आणि अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य डॉ.आर.जे बार्नबस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
    यावेळी उपप्राचार्य प्रो.डॉ.प्रितमकुमार बेदरकर, उपप्राचार्य प्रा.डॉ.नोयल पारगे, प्रा.दिलीपकुमार भालसिंग आणि कॉलेजचे रजिस्ट्रार दिपक आल्हाट उपस्थित होते.
     पुढे बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.बार्नबस म्हणाले की, त्यादृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत . लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड आणि  पर्यावरणाची नासाडी यामुळे पृथ्वीवरील वाढतात ताण विचारात घेऊन सन १९९२ मध्ये 'रिओ दि जानेरो' येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचवण्याचा दृष्टीने विविध विषयावर चर्चा झाली. त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे ठराव ही संमत करण्यात आले. यावेळी अजेंडा २१ या नावाने प्रसिद्ध झालेला घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशदेशाच्या सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पाडल्याचा जवळपास २५ वर्षांच्या कालखंड लोटला आहे. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत गेलेली आहे. जागतिक लोकसंख्या १.६अब्जने दरवर्षी वाढत आहे. या प्रचंड वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी पृथ्वी जेवढी देऊ शकते किंवा राखू शकते त्याहून अधिक प्रमाणात तापमान वाढ एकट्या कार्बन डायऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइडच्या विसर्जनाचे मोठे स्त्रोत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करत असतो, त्या त्यावेळी खनिज इंधने कार्बन डायऑक्साइडची निर्मिती करत असतो. जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो. केवळ खनिज इंधनाद्वारे जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या वायूचे निर्मिती होते असे नव्हे तर आपल्या छोट्या मोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणाऱ्या वायूंची निर्मिती होत असते, जसे की आपल्याला नको असलेले अन्न जेंव्हा आपण फेकून देतो तेंव्हा जमीन घेतलेल्या गेलेल्या अन्नामुळे ही जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या वायूंचे निर्मिती होत असते. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे आजमितीस उत्पादित अन्नाच्या साधारणपणे एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. या कृतीतून आपण कोणाच्यातरी हक्काच्या अन्नाची नासाडी करतो. शिवाय अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली गेलेली जमीन, पाणी आणि ऊर्जा या संसाधनांची एका अर्थाने नासाडीच करत असतो आणि अंतिमतः तापमान वाढीला चालना देत असतो, असे सविस्तर विवेचन प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांनी केले. 
     कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.विलास नाबदे यांनी सुत्रसंचालन प्रा.डॉ.माधव जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार  प्रा.डॉ. पोपट शिनारे यांनी मानले.  
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.भागवत परकाळ, प्रा.डॉ. पवनजीत छाबडा,  प्रा.डॉ. सय्यद रज्जाक, प्रा. डॉ. अशोक घोरपडे, प्रा.डॉ.माधव शिंदे, प्रा.ऐश्वर्या सागडे आणि प्रा. अजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.
      कार्यक्रमास राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुधिर वाडेकर, प्रा.डॉ.पराग कदम , प्रा.डॉ.विजय कदम, प्रा.डॉ.राजेश टाक, प्रा.डॉ. सचिन मोरे आणि विविध विभागातील विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा