गरिबीचे चटके सोसून जिल्हाधिकारी पदापर्यंत गाठलेले ध्येय प्रेरणादायी - प्रा. माणिक विधाते; श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोरक्षनाथ गाडीलकर यांचा सत्कार


मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) २९.८.२०२३
    येथे उपजिल्हाधिकारी राहिलेले व नुकतीच जिल्हाधिकारीपदी बढती मिळालेले पारनेर तालुक्यातील पळवे गावचे भूमिपुत्र गोरक्षनाथ गाडीलकर यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराला भेट दिली. मंडप कामगार ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा संघर्षमय प्रवास गाठणारे गाडीलकर विशाल गणेश चरणी नतमस्तक झाले.
     श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गाडीलकर यांचा मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मंदिराचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांनी सत्कार केला. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, पारनेर मार्केट कमिटीचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, स्नेहबंध फाऊंडेशनचे उध्दव शिंदे, माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के, किंगर आदी उपस्थित होते.
    यावेळी प्रा. विधाते म्हणाले की, गरिबीचे चटके सोसून गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी पदापर्यंतचे गाठलेले ध्येय सर्वांना प्रेरणादायी आहे. अहमदनगरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर नाशिकला उपविभागीय महसुल उपायुक्त म्हणून त्यांनी उत्तमपणे कामकाज केले. तर त्यांना जिल्हाधिकारीपदी मिळालेली बढती सर्व अहमदनगरकरांच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
        सत्काराला उत्तर देताना गाडीलकर यांनी प्रामाणिक व निष्ठेने केलेल्या कामाचे फळ मिळाले. सत्कर्माने केलेले कार्य व श्री विशाल गणेशाच्या आशिर्वादाने समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा