मख़दूम समाचार
अहमदनगर (महेश कांबळे) १.९.२०२३
केरळ राज्यात नववर्षाची सुरूवात ओणम या सणापासून होते. त्यामुळे केरळी लोकं हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अहमदनगरमध्येही सर्वांनी हा उत्सव साजरा केला असून शहरात केरळी व मल्याळी कुटूंबियांची असंख्य घरे आहेत. येथील मजदूर सेनेचे पदाधिकारी व भाजप साऊथ इंडियन सेलचे जिल्हाध्यक्ष वसंतसिंग यांच्या सावेडी येथील घरी आज ओणम साजरा करण्यात आला. त्यानिमित्त घरापुढे फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी वसंतसिंग, हेमा वसंत, गिरीष्मा वसंत, शरथ, जानव्ही भांगे, रोशनी भाटिया, वैष्णवी भोरे, अभिषेक तिवारी आदी उपस्थित होते. सर्वांनी एकत्रित केळीच्या पानावर बसून केरळी जेवणाचा आस्वाद घेतला व पारंपरिक नृत्य केले.
हा सन दिवाळीसारखा असून वामन अवतारातील बळीराजा/महाबलीच्या स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो. बटू वामनाने फसवून पातळात घातलेल्या बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी दहा दिवस पृथ्वीवर येतो. त्याच्या स्वागतासाठी घरापुढे फुलांच्या रांगोळ्या काढल्या जातात. ओनमच्या सणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. हनुमान तिरु ओनम यादिवशी मल्याळी नागरिक घरासमोर फुलांची रांगोळी काढतात त्याला पुक्कलम म्हणतात. यादिवशी इतर समाजाचे नागरीक शुभेच्छा देण्यासाठी केरळी बांधवांच्या घरी येतात.
ओणम हा दिवस केरळी बांधवांसाठी मोठा उत्साहाचा आहे. ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याचे पूजन मोठ्या उत्साहात केले जाते. दक्षिण भारतामधील केरळमध्ये ओणम सणाचे फार महत्व आहे तर शेतात धान्य उगवल्याच्या आनंदात १० दिवस ओणमचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसात दक्षिण भारतीय महिला घराला फुलांनी सजवातात.
असे म्हटले जाते की, थिरुओणम या दिवशी वर्षातून एकदा असुर राजा महाबली त्याच्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळामधून धरतीवर अवरतो असे मानले जाते. त्यामुळेच राजाला खुश करण्यासाठी आंबट-गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. देवाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवत सामूहिक रितीने त्याचे भोजन केले जाते. विष्णूने वामन अवतार धारण करुन बळीराजाला पाताळात घातले. बळीराजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही दिले. बळीराजाच्या त्यागावर खुश होऊन विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ओनमच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असे समजले जाते.
या सणावेळी घरात लज्जतदार पदार्थ बनवले जातात. ओणम सणाची परंपरा ही जुन्या काळापासून चालत आली आहे. तर ओणमच्या वेळी केळीच्या पानात जेवण वाढले जाते. या दिवसात केरळवासीय एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद द्विगुणीत करताना दिसून येतात. ओणम सणावेळी नावस्पर्धा, नृत्य, संगीत, महाभोज यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते. या दिवशी घरातील सदस्य पारंपरिक वेशात दिसतात. त्याला 'ओनाकोड्डी' असंही म्हणतात. यामध्ये स्त्रीया सफेद व गोल्डन रंगाची काठ असलेली साडी परिधान करतात. तिरुओणम हा सणाचा शेवटचा दिवस असतो. यानिमित्ताने ११ वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी केली जाते. पारंपरिक असे चविष्ट पदार्थ घरातील महिला मोठ्या उत्साहाने बनवतात, तर खाद्यपदार्थांची ही मेजवानी केळीच्या पानांवर वाढली जाते.
Post a Comment