भारतातून कायमचे निघून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे

देशाची तुफान आर्थिक प्रगती होत आहे , आता देशात बहुसंख्यांक हिंदूंचे राष्ट्र आहे / येणार आहे असे सांगितले जाते , पण  भारतातून कायमचे निघून जाणाऱ्या , पर्यटक म्हणून नाही तर दुसऱ्या देशाचे कायमचे नागरिकत्व घेणाऱ्या एलिट क्लास मधील भारतीय नागरिकांची संख्या वाढत आहे 

२०१८ : १,३४,०००
२०१९ : १,४४,०००
२०२०: ८५,०००
२०२१: १,६३,०००
२०२२: २,२५,००० 
२०२३ : ८७,००० (फक्त पहिल्या सहा महिन्यात) 
(संदर्भ हिंदू बिझिनेस लाईन सप्टेंबर १ , २०२३)

भारत देश कायमचा सोडून जाणारे नागरिक काही मेक्सिको मधून कुंपण ओलांडून अमेरिकेत घुसणारे गरीब नाहीत किंवा आफ्रिकेतून लाकडी होडीतून समुद्रात जीव धोक्यात घालून युरोपियन देशात प्रवेश करू पाहणारे निर्वासित नाहीत 

मालदार लोक आहेत आपल्या देशातील ; सर्व काही कायदेशीर पद्धतीने करणारे आणि यजमान देशात देखील टेचात राहू शकणारे ; लक्षात घ्या यातील सर्व अमेरिका , ऑस्ट्रेलिया , कॅनडा , ब्रिटन , सिंगापूर अशा अति प्रगत देशात नागरिकत्व घेत आहेत ; खरेतर ते यजमान देश त्यांना नागरिकत्व देत आहेत ; ते यजमान देश ऐऱ्यागैऱ्याला नागरिकत्व देत नसतात , फक्त मलदारांनाच देतात 

उदा. यजमान देशात रियल इस्टेट विकत घेणारे , यजमान देशात भांडवली गुंतवणूक करणारे इत्यादी 
_________________________________

आता दुसरी आकडेवारी बघा (संदर्भ वायर )

रिझर्व्ह बँकेच्या   लिबरलाईज्ड रेमिंटनस स्कीम _ LRS परिपत्रकाप्रमाणे भारतातील कोणीही नागरिक दरवर्षी २,५०,००० डॉलर्स म्हणजे अंदाजे २ कोटी रुपयांपर्यंत भारताबाहेर पाठवू शकतो ; नो क्वेश्चन्स आस्क्ड 
या एलआरएस अंतर्गत खालील प्रमाणे परकीय चलन देशाबाहेर पाठवले गेले (वित्तीय वर्ष , डॉलर्स कोटी मध्ये 

२०१५ : १३० कोटी 
२०१६ : ४६० कोटी 
२०१७ : ८२० कोटी 
२०१८ : ११३० कोटी 
२०१९: १३८० कोटी 
२०२० : १८८० कोटी 
२०२१: १२७० कोटी 
२०२२: १९६० कोटी 
२०२३: २८०० कोटी म्हणजे अंदाजे अडीच लाख कोटी रुपये 
२०२४ : अंदाजित ३५०० कोटी 

कोण आहेत या व्यक्ती ; कशासाठी एवढे डॉलर्स देशातून विकत घेऊन देशाबाहेर पाठवत आहेत ? 
___________________________

अजून एक आकडेवारी 

वित्तीय वर्ष २०२२-२३ सालात देशात आलेल्या परकीय प्रत्यक्ष  गुंतवणुकी / एफडीआय होत्या २७१४ कोटी डॉलर्स ; २०२२-२३ या वित्त वर्षात देशाबाहेर पाठवलेले २८०० कोटी डॉलर्स देशात आलेल्या एफडीआय पेक्षा पहिल्यांदा जास्त होते 

__________________________

जात / धर्मांच्या अस्मिता , आम्ही यांची ठासून मारली , हे कसे भ्रष्ट , ते किती भ्रष्ट याच्यापलीकडे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी काही मुद्दे ; वरकरणी सुटे वाटतील , पण बघा कनेक्ट करून 

१.  वर्षाला २,२५,००० व्यक्ती नागरिकत्व सोडतात म्हणजे दिवसाला ६०० व्यक्ती ; तासाला २५ 
वर्षाला २८०० कोटी डॉलर्स पाठवण्यासाठी विकत घ्यायचे म्हणजे  २,५०,००० कोटी रुपये  खिशात हवेत ; कोणाकडे असतील 

२.  आधीच्या परिच्छेदात बाहेरच्या देशात जाऊन नागरिकत्व घेणाऱ्यांचे आकडे आहेत तर दुसऱ्या परिच्छेदात देशाबाहेर पाठवलेल्या डॉलर्सचे ; पहिल्या परिच्छेदातील व्यक्तीच डॉलर्स पाठवतात असे कोठेही म्हटलेले नाही ; 

एक काम करा ; एक प्रयोग करूया; तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना , ऑफिसमध्ये , मित्रांमध्ये , नातेवाईकांमध्ये “एलआरएस हि टर्म / संज्ञा तुम्हाला माहित आहे का” असा एक स्वतःच नॅनो लेव्हलचा सर्वे घ्या ; ज्यांना हि टर्मच माहित नसेल ते काही डॉलर्स परदेशी पाठवणारे खचितच असतील ; तुम्ही काढा निष्कर्ष नागरिकत्व घेणारे , 

३.  जे वर्षाला २,५०,००० कोटी डॉलर्स रुपये मोजून विकत घेतात ते स्वतः काही डॉलर्स कमवत नाहीत ; ते कमवतात दुसरेच , लाखो कारागीर, स्वस्तात श्रम करणारे कामगार , डोळ्यांच्या खाचा करून घेणारे हिरे कामगार इत्यादी 

४.  देश कायमचे सोडून जाणाऱ्या व्यक्ती नक्की कोणत्या  सामाजिक / राजकीय विचारधारेचे असतात 
__________________________

 आपल्याकडे सामाजिक / आर्थिक विषयांवर संशोधन करणाऱ्या , आकडेवारी गोळा करणाऱ्या , विविध डॉटस कनेक्ट करून दाखवणाऱ्या , भारतातील प्रांतीय भाषेत हे सगळे लोकांना सांगणाऱ्या संस्था हव्यात ; त्यांनी खोटे पासवणाऱ्या फॅक्टरीज काढल्या. आपल्याकडे खरे सांगणारी वर्कशॉप्स तरी हवीत 

संजीव चांदोरकर (४ सप्टेंबर २०२३)

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा