नगर - भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकर्ता प्रशिक्षण संयोजन समितीमध्ये नगरच्या प्रा.भानुदास बेरड यांची प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे. या समितीत राज्यातील 11 जणांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये प्रा.भानुदास बेरड यांची नियुक्ती विशेष मानली जाते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मुलभुत घटकांचे अधिकाधिक प्रभावी प्रशिक्षण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील पक्षातील अनुभवी अशा पदाधिकार्यांनी संयोजन समिती गठीत करण्यात आली आहे.
प्रा.भानुदास बेरड हे यापुर्वी पक्षाचे सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले असून, सध्या भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध पातळ्यांवर होणार्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण, नियोजन, गोवा राज्याच्या विधान सभा निवडणुकीतही प्रा.बेरड यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती.
Post a Comment