१०० खाटांच्या 'कामगार हॉस्पिटल' मंजूरीमुळे कामगार संघटनांनी केला शहीद भगतसिंह स्मारकात आनंदोत्सव साजरा !


मख़दूम समाचार 

अहमदनगर (प्रतिनिधी)  १८.९.२०२३

    येथील आयटक, सिटू व क्रांतिसिंह या कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनांसह कामगार हॉस्पिटल कृती समिती यांनी २०१६ पासून मागणी आणि पाठपुरावा करत असलेल्या कामगार हॉस्पिटलला केंद्रातील  इएसआयसी खात्याने १०० खाटांच्या हॉस्पिटलची मंजूरी दिल्याने आज आनंदोत्सव साजरा केला. शहीद भगतसिंह स्मारक येथे एमआयडीसी तसेच शहरातील सर्वकामगार संघटनांचे नेते, प्रतिनिधी व कार्यकर्ते एकत्र येत गोडधोड म्हणून एकमेकांना चॉकलेट वाटप केले.
     प्रथम शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास महादेव पालवे, संध्या मेढे आणि युनूसभाई तांबटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेस सुरूवात करण्यात आली. यावेळी सर्वांनी "इन्कलाब जिंदाबाद" , "शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो", " भांडवलशाही मुर्दाबाद"  या घोषणा दिल्या.
    कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी आयटक, सिटू आणि क्रांतिसिंह कामगार संघटना या कम्युनिस्ट कामगार संघटनांनी २०१६ पासून कामगार हॉस्पिटलसाठी काय काय आंदोलने केली. कसा कसा पाठपुरावा केला याची माहिती देवून संघटनांच्या राज्य व दिल्ली येथील वरीष्ठ नेतृत्वाने केंद्रात पाठपुरावा केल्याने  इएसआयसी खात्याचे कामगार हॉस्पिटल मंजूरीमुळे आभार मानले तसेच आता फक्त मंजुरी मिळाली आहे. हे हॉस्पिटल पुर्ण करून घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची असून या पुढेही असाच व्यापक पाठपुरावा कला जाईल याची ग्वाही दिली.
    ॲड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी सरकारने रद्द केलेल्या कामगार कायद्यांसाठी व्यापक जनांदोलन करावे लागेल तसेच विविध माध्यमातून हे कायदे पुनर्स्थापित करण्यासाठी सरकारवर कामगारांचा दबाव वाढवावा लागेल असे सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.
    यावेळी मनोगत व्यक्त करताना क्रांतिसिंह कामगार संघटनेचे भैरवनाथ वाकळे यांनी सांगितले की, आता फक्त १०० खाटांच्या कामगार हॉस्पिटलला मंजुरी आली आहे. हे हॉस्पिटल उभे रहाण्यास भांडवलदारांचे दलाल पुढारी अडथळा करतील त्यावेळी आपल्याला या कामगारविरोधी नेतृत्वाविरोधात संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी आपण तयार आहोत. कामगार हॉस्पिटल पुर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही. ज्यावेळी एमआयडीसी स्थापन झाली तेंव्हाच हे हॉस्पिटल व्हायला पाहिजे होते. पण आंधळे, बहिरे व मंदबुध्दी नेतृत्व मिळाल्याने यासाठी आपल्यालाच पाठपुरावा करून हे मंजूर करून घ्यावे लागले. हे पुर्ण करून घेण्यासाठी सर्व कामगार संघटनांना सोबत घेऊन कामगार चळवळ मोठी करू.
    यावेळी महादेव पालवे, सिध्देश्वर कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून व्यापक कामगार एकजूट असेल तर कोणतेही काम अशक्य नाही हे सांगितले.
   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामगार हॉस्पिटल कृती समितीचे अध्यक्ष दिपक शिरसाठ यांनी तर आभार अरूण थिटे यांनी मानले.
   आनंदोत्सवात बाळासाहेब साकडे, लहु लोणकर, राजू निमसे दत्ताभाऊ वडवणीकर, विजय केदारे, संतोष गायकवाड, चंद्रकांत माळी, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या समीक्षा वाकळे, एकनाथ ससे, राजेंद्र शिरसाठ, भाऊसाहेब फुलपगारे, अनिल अंधारे, बापू खंडागळे, अशोक रिसे, संतोष पुंड, सोमनाथ जाधव आदींसह औद्योगिक कामगार सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा