मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १८.९.२०२३
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते ७६ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ काल हरियाणा येथील समालखात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाच्या पावनभूमीवर करण्यात झाला. वार्षिक निरंकारी संत समागम दि. २८, २९ व ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. याप्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, सेवादल अधिकारी, स्वयंसेवक तसेच दिल्ली व जवळपासच्या राज्यांसह इतर राज्यांतील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उल्लेखनीय आहे, की भव्य रुपात आयोजित करण्यात येत असलेल्या या या संत समागमाच्या पूर्व तयारीसाठी समागम सेवांमध्ये भाग घेण्यासाठी अहमदनगर परिक्षेत्रातील सेवादल सदस्य व अन्य भक्तगणांच्या तुकड्या रेल्वेने समागम स्थळी रवाना झाल्या असून समागम संपन्न होईपर्यंत सातत्याने आपल्या सेवा देत राहणार आहेत.
सेवांच्या या शुभारंभ प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सेवा केवळ तनाने होत नाहीतर मनापासून केली जाते आणि तेव्हाच ती सार्थक गणली जाते. नि:स्वार्थ व निष्काम भावनेने केलेली सेवा सर्वोत्तम असते.
सद्गुरु माताजींनी सेवेच्या सार्थकतेबद्दल निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की निरंकारी मिशनच्या प्रत्येक भक्ताने याठिकाणी प्राप्त होणार्या उदात्त शिकवणूकीतून सतत प्रेरणा घेऊन एका सुंदर समाजाच्या नवनिर्मितीमध्ये आपले योगदान द्यावे.
◾
Post a Comment