मख़दूम समाचार
अहमदनगर (सा.सु.) २६.९.२०२३
अहमदनगर महाविद्यालयामधील गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त २७, २८ व ३० सप्टेंबर या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या व्याख्यानमालेमधून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वाढते संगणकीकरण फायदे आणि तोटे, विवेकवादी चिकित्सा, इ - ग्रंथालयीन वापर, गांधीचे बहुस्तरिय पैलू याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. गांधी अभ्यास केंद्राच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये नवे विचार, गांधी विचारांबद्दल चिकित्सा, राष्ट्रवाद, मूल्य, दृष्टिकोन आदी मूल्यवर्धित करण्याचे प्रयत्न करण्यात येतात.
या व्याख्यानमालेमध्ये आय.एम.एस. इन्स्टिट्युटच्या ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस या 'ग्रंथालय वापर, डिजीटल लायब्ररी व ऑनलाईन सर्च', प्रा.डॉ.सुधीर वाडेकर हे 'महात्मा गांधी यांचे धार्मिक विचार' तर न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्राजक्ता ठुबे या महात्मा गांधीं यांचे काही दुर्लक्षित पैलू' याविषयी व्याख्यान देणार आहेत.
अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या मार्गदर्नाखाली गांधी अभ्यास केंद्र मूल्यवर्धित संस्काराचे विविध उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबविले जात आहे. असे उपक्रम राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे, अशी माहिती प्रा. विलास नाबदे यांनी दिली.
Post a Comment