मख़दूम समाचार
पुणे (प्रतिनिधी) २६.९.२०२३
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सामाजिक प्रबोधन केल्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार यावर्षी लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.
सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार आतापर्यंत श्रीराम लागू, निखिल वागळे, पुष्पा भावे, विद्या बाळ यासारख्या मान्यवरांना देण्यात आला आहे.
हेरंब कुलकर्णी हे अहमदनगरमधील हिंद सेवा मंडळ संस्थेच्या सिताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक असून विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर असतात. हेरंब कुलकर्णी यांची ११ पुस्तके व ४ पुस्तिका प्रसिद्ध असून वृत्तपत्रात सतत लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी सातत्याने समाजातील वंचित वर्गाच्या प्रश्नाबाबत प्रश्न मांडले. त्यावर सतत केलेले लेखन, विविध प्रश्नावर घेतलेल्या भूमिका, दिलेली व्याख्याने, समाज माध्यमाचा सामाजिक प्रश्नांसाठी केलेला प्रभावी वापर यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
प्रवाहाविरुद्ध सातत्याने धाडसी भूमिका मांडणाऱ्या आगरकरांच्या नावाचा हा पुरस्कार नक्कीच सातत्याने भूमिका मांडण्याचे धैर्य देईल, असे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले
ता. १ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
Post a Comment