लेफ्टनंट कर्नल डॉ. सोमेश्वर गायकवाड सेवापूर्ती सोहळा संपन्न

अहमदनगर - सोमेश्वर गायकवाड यांच्या भारतीय सेनेच्या चिकित्सा कोर मधून सेवानिवृत्ती
झाली, प्रसंगी त्यांची जन्मभूमी श्रीरामपूर येथे मोठा सेवापूर्ती सोहळा घडून आणला गेला. अमर जवान स्मारक बेलापूर नाका श्रीरामपूर येथे पुष्पचक्र अर्पण करून,श्रीरामपूरच्या पेठेमध्ये त्यांची
देशभक्ती गीतामध्ये मिरवणूक काढण्यात आली. भारतीय सेना
दलाच्या बँड धून मध्ये शहर दणाणले होते. सोमेश्वर गायकवाड यांच्यावर हार पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. याप्रसंगी कर्नरल सोमेश्वर गायकवाड व पत्नी कविता गायकवाड,वडिल नारायण गायकवाड,आई लता गायकवाड, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, विलास पुंड, सुभेदार शेख, कॅप्टन सांगळे, कॅप्टन तांदळे, सुभेदार सचिन कसाब, सुभेदार फसले, सुभेदार साठे,माजी सैनिक दुशांत घुले, शिवाजीराव वाघमारे आदी उपस्थित होते. यश फाउंडेशनचे संस्थापक सचिव व माजी सैनिक संजय डोंगरे यांनी यश फाउंडेशन व शेवगाव तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने कर्नल सोमेश्वर गायकवाड यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.
तसेच पारनेर येथील राम रहिम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रफिक शेख मेजर यांनी पण कर्नल गायकवाड यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. 
प्रसंगी कर्नल डॉ. सर्जेराव नागरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 
सोमेश्वर गायकवाड यांनी एमबीबीएसच्या नंतर मेडिसिन एमडी ही पदवी धारण केल्यानंतरही भारत मातेच्या सेवेचा ध्यास घेऊन भारतीय सैन्यात सेना चिकित्सा कोर (ए एम सी) मध्ये मेडिकल स्पेशलिस्ट म्हणून जॉईन केले. त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध
भागामध्ये आपली सेवा दिली. त्या माध्यमातून विविध प्रकारचे सेना पदक त्यांना मिळाले. ज्यामध्ये सैन्य सेवा मेडल,काउंटर इन्सर्जन्सी मेडल, मरुस्थल मेडल, सियाचीन मेडल, (दोनदा) हाय अल्टि मेडल, विदेश सेवा मेडल, नाईन इयर्स सर्विस मेडल, ७५ इयर्स इंडिपेंडेंस मेडल पदकांचा समावेश आहे. 
सेवापूर्ती कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात आजी- माजी सैनिक उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा