'शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षसमाप्ती' आणि सत्यशोधकांचे विशेष अधिवेशन

मख़दूम समाचार 
मुंबई (प्रतिनिधी)  २३.९.२०२३
     ता. २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाज स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत तसेच २३ एप्रिल २०२३ रोजी महान सत्यशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची १५० वी जयंती होऊन गेली. या दोन्ही घटनांचे औचित्य साधून रविवार ता. २४ सप्टेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाचे सभागृह, आझाद मैदान, मुंबई महानगरपालिका मुख्यालयाशेजारी सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
      दै. शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे  आणि ओतूर येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्या संयुक्त विद्यमाने या अधिवेशनाचे आयोजन होत आहे.
   अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वा. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दै. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे उपस्थित राहणार आहेत तर आमदार भाई जयंत पाटील हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून प्रा. एस. व्ही. जाधव, मा. आमदार प्रकाशबापू शेंडगे, मा. खासदार हरिभाऊ राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  ओतूर आणि जुन्नर तालुका सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे. त्यामुळे आपल्या जुन्नर तालुक्यातील सत्यशोधकांनी या अधिवेशनास बहुसंख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती 'शिवनेर'चे संपादक नरेंद्र विश्वनाथराव वाबळे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल विलासराव तांबे, अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर, इंजि. रमेश देशमुख या निमंत्रितांनी केली आहे.
कार्यक्रम :  सकाळी १० ते ११:३० उद्घाटन सत्र वरील मान्यवरांच्या उपस्थितीत.
सकाळी ११:३० ते दुपारी १ परिसंवाद. 
 विषय :  महात्मा फुले आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचार आजही महत्त्वाचे का? अध्यक्ष :सुप्रसिद्ध विचारवंत चंद्रकांत वानखेडे. सहभाग : डॉ. भालचंद्र मुणगेकर, ॲड शंकर निकम, विश्वास उटगी.
भोजन : १:२० ते २:२०. खुले सत्र : दुपारी : २.२० ते ३.१० संविधनावर गाणी आणि गप्पा कार्यक्रम. संविधान प्रचारक आणि युग क्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा
दुपारी ३.१० ते ३.३० अंबुजवाडीतील तोडक कारवाई आणि शहरी गरिबांचे प्रश्न. पूनम कनौजिया आणि साथी, घर बचाओ घर बनाओ आंदोलन. दुपारी  : ३.३० ते ३.५०  मुंबईतील पाणी वितरणाच्या आणि बेघर मुंबईकरांच्या समस्येबाबत सादरीकरण. सिताराम शेलार आणि साथी,
पाणी हक्क समिती. दुपारी ३.५० ते ४.१० एकल महिला आणि तरुणांचे प्रश्न. निसार अली आणि साथी, सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, काच पाडा, मालवणी. ४.१० ते ४.३० जोडीदाराची विवेकी निवड व सत्यशोधक विवाह. सचिन थिटे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती. ४.३० ते ५.०० समारोप.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा