मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २१.९.२०२३
येथील आनंदधाममधे प. पू. प्रवर्तक श्री कुंदनऋषीजी म.सा. आणि प. पू. उपप्रवर्तिनी प्रियदर्शनाजी म. सा. यांच्या सानिध्यात संवत्सरीनिमित्त १०० तपस्वींनी आठ दिवस तसेच १० तपस्वींनी ९ दिवसांची व प्रितेश राजेंद्र चंगेडिया यांनी २१ दिवसाची तसेच योगिता विक्रम मुथा यांनी १६ दिवसाची निरंकार तप आराधना केली.
त्याप्रित्यर्थ तपस्वींचा अहमदनगर श्रावक संघातर्फे श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, जैन कॉन्फरेन्सचे राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शक अशोक तथा बाबुशेठ बोरा, श्रावक संघाचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, श्रावक संघाचे ज्येष्ठ श्रावक चांदमल ताथेड, अशोक पारख, रतिलाल कटारिया व नितीन शिंगवी यांनी तपस्वींचा माळ व चांदीची नाणे देऊन सन्मान केला.
Post a Comment