आरोग्य सेवा हक्क समितीचे अमर जाधव यांना आरोग्यरक्षक पुरस्कार जाहीर !


मख़दूम समाचार 
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २१.९.२०२३
     शेंदूरजणे गावचे सुपुत्र असलेले मुंबई तसेच वाई, सातारा पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते अमर मनोहर जाधव यांची दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या राज्यस्तरीय आरोग्यरक्षक पुरस्कार - २०२३ साठी निवड करण्यात आली आहे.
    आरोग्य सेवा हक्क समिती, महाराष्ट्र राज्य या समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले अमर जाधव हे विविध संघटना, संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. ते मुंबईतील सम्राट अशोक सामाजिक संस्था, बौद्ध सेवा संघ, मानवता एक संदेश या संस्थांचे सक्रीय सदस्य आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे वरळी विधानसभेचे महासचिव असलेले अमर जाधव, शांती वैभव बुध्द विहार, नवतरुण क्रीडा मंडळ या नामांकित संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांना मिळालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रमुख उद्देशाने विविध क्षेत्रांत अखंड अविरतपणे, निःस्वार्थपणे जनसेवा करीत आहेत. विधायक कार्यास प्रेरणा देण्याच्या उद्देशाने सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, वैद्यकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, कृषी, संशोधन, पत्रकारिता क्षेत्रांतील गौरवपूर्वक आणि उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रांत सेवाभावी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान करण्यात येतो.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा