मेंढपाळाच्या घरी कष्टाचे पेटंट, आदर्श राज्यघटनेचे फलित; जिल्ह्याचा नावलौकीक वाढविणारे इंजि. नामदेव शंकरराव राशिनकर

(इंजि. नामदेव शंकरराव राशिनकर)

मख़दूम समाचार
नेवासा (रावसाहेब राशिनकर) २१.९.२०२३
    आदिवासी आणि मागासलेल्या धनगर समाजातील मेंढपाळाच्या मुलाने कोणतीही विशेष शैक्षणिक, कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित करुन समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नुकतेच अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण पेटंटला गवसणी घालून बौद्धिक क्षमतेची चुणूक दाखवून दिली. मागासलेल्या समाजाला शिक्षणाचा मुलभूत हक्क राज् घटनेत नमूद करणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या आदर्श भारतीय राज्यघटनेचे हेच खरे फलीत आहे.
  पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील  माईर्स एम.आय.टी. संचलित एम.आय.टी.अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमधे कार्यरत असलेले आणि नेवासा तालुक्यातील चांदा गावातील मुळ रहिवासी इंजि. नामदेव शंकरराव राशिनकर यांना भारत सरकारने यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण पेटंट बहाल केले आहे.
    'टेम्परेचर मेजरमेंट टेक्निक फॉर कंबाइन्ड फेस अँड शोल्डर ग्राईंडींग ऑपरेशन'  हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. संशोधनासाठी भारत सरकारने अकरा लाख रुपये अर्थसहाय्य केलेले असून यामुळे औद्योगिक उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कुलंटची बचत होऊन प्रॉडक्शन क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होणार आहे. धनगर या कष्टकरी, आदिवासी समाजाला पेटंटचा बहुमान मिळवून देणारे ते पहिलेच ठरले आहेत. याआधीही त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकात काही निवडक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.
   नामदेव राशिनकर हे अभियांत्रिकी पदवीधर आणि व्यवस्थापन शास्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून आदर्श शिक्षक मोहन शंकरराव राशिनकर यांचे कनिष्ठ बंधू आहेत. 
     यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते त्यांचा एक्कावन्न हजार रूपये, शाल, श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. प्राचार्य महेश गौडर, डॉ. अभिजीत माळगे, डॉ. माया चरडे आणि शिक्षकवृंद यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. चांद्यासह नेवासा तालुका आणि अहमदनगरचा नावलौकिक वाढविल्याने त्यांचे रयत समाचार परिवाराच्या वतीनेही विशेष अभिनंदन.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा