दिनांक २५ सप्टेंबर २०२३. इंडियन सैकैटिस्ट सोसायटी, राहत हॉस्पिटल, मौलाना आझाद कॉलेज (मानसशास्त्र विभाग), औरंगाबाद एजुकेशनल अँड वेल्फेर सोसायटी व कफील एजुकेशनल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने "वृद्ध वयात होणारे आजार व त्यावर उपाय" तसेच "वृद्ध पालकांची काळजी कशी घ्यायची" या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मझहर अहमद फारुकी हे होते. सु-प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. लाईक उर रहमान यांनी वृद्ध अवस्थेत होणारे आजार ज्या मध्ये श्रवणशक्ती कमी होणे, मोतीबिंदू आणि अपवर्तक त्रुटी, पाठ आणि मान दुखणे आणि ऑस्टियोआर्थरायटिस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, मधुमेह, नैराश्य आणि स्मृतिभ्रंश ह्या आजाराचे लक्षण व त्यांच्यावर उपाय या विषयावर उपस्थितांचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. फिरदोस फातेमा यांनी विविध उदाहरणाने दैनंदिन जीवनामध्ये वृद्ध लोकांना येणाऱ्या अडचणी कशी दूर करता येऊ शकते या विषयावर आपले मत प्रकट केले. डॉ. मझहर फारुकी यांनी अध्यक्षीय भाषणात नवीन पिढीने जुन्या पिढीची काळजी कशी घ्यावी या विषयावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोहेल झकीऊद्दीन यांनी केले. डॉ. सकावत खान, डॉ. अब्दुल रऊफ, डॉ. मुसक रजक व डॉ. अझर पटेल यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती.
Post a Comment