अहमदनगर- श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मानाचा विशाल गणपतीच्या पूजा करून सुरुवात होते. व भावीक जागोजागी याचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करून दर्शन घेत असतात. त्याचप्रमाणे मागील आठ वर्षापासून अहमदनगर येथील रंग संस्कृती ग्रुपच्या वतीने विशाल गणेश मिरवणूक मार्गावर भव्यदिव्य अशी पायघडया रांगोळीने स्वागत केले जाते. यावर्षीही विशाल गणेश मिरवणुकीच्या मार्गावर स्वागतासाठी तेलीखुंट, कापड बाजार, अर्बन बँक रोड,नवीपेठ, चितळेरोड ते दिल्ली गेट पर्यंत भव्य अशी रांगोळी काढण्यात आली. यासाठी 1000 किलो रांगोळी व नऊ तास वेळ लागला. या उपक्रमात आहेर परिवार आणि रांगोळी आर्टिस्ट दिनेश मंजरतकर, श्रीकांत आडेप, बाळासाहेब डोशी, धीरज गोंडळकर, मुस्ताक शेख, किरण वाघचौरे, हेमंत जाधव, सागर घोडके,राम गालपेल्ली,भरत राठोड, महिला व बाल मित्रांनी सहभाग घेऊन ही रांगोळी काढली. ही रांगोळी काढत असताना पाहणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या उपक्रमाचे व रांगोळी चे सर्वांनी भरपूर कौतुक केले.
Post a Comment