गणेशोत्सवातील उर्जा वर्षभर टिकून राहते - पो.नि.चंद्रशेखर यादव; पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न


मख़दूम समाचार

अहमदनगर (प्रतिनिधी) ३०.९.२०२३

    गणेशोत्सवाच्या काळात सर्व वयोगटासाठी स्पर्धा घेऊन त्यांच्यातल्या अनेक कला-गुणांना वाव दिला आहे. पुण्यश्लोक तरुण मंडळाने परंपरा जपत खर्‍या अर्थाने उत्सव काळात एकोप्याचे दर्शन घडवत विचारांची देवाण-घेवाण केल्यामुळे हीच उर्जा वर्षभर टिकून राहते, असे सांगुन पुण्यश्लोक तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.

     कजबेवस्ती परिसरातील देवीकृपा कॉलनीमधील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्यावतीने बक्षिस वितरणप्रसंगी पो.नि.यादव बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निशांत दातीर, उद्योजक सुनिल भंडारी, कुणाल जायकर, प्रा.बाळासाहेब शेंडगे, विष्णू बारगळ, अंकुश गावडे, इंजि.डी.आर.शेंडगे, बाळासाहेब थोरात, संदिप क्षीरसागर, दत्तात्रय सोलाट, हेमंत कुटे, चंद्रशेखर शिरसाठ, हरिष बर्‍हाटे, गणेश भोर, आदिनाथ बर्डे, अमोल काळे, अमर बामदळे, वैभव कथले, चंद्रकांत वाव्हाळ आदि मान्यवर उपस्थित होते.

     पुढे बोलतांना पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या अभ्यासामुळे पालकही चिंतेत असतात. छोट्या कुटूंब व्यवस्थेमुळे मुलांच्या सुप्त गुणांना दाद मिळत नाही. गणेशोत्सव काळात दहा दिवस विविध स्पर्धेच्या माध्यमातून मुलांच्या बुद्धीला चालना मिळते आणि बक्षिसे मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असते. तेव्हा अशा स्पर्धांचे नियमित आयोजन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

     प्रारंभी मंडळाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रम, स्पर्धा व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या विविध बाबींबाबत धावता आढावा मंडळाचे कुणाल जायकर यांनी मांडला.

     उत्सव यशस्वीतेसाठी कृष्णा कजबे, प्रा.गणेश भवार, रोहिदास उल्हारे, प्रा.धिंदाळे, दत्तात्रय सुरम, अतिष वाकोडे,  विजय कजबे, राहुल कडूस, दिपक पाटील, दिलीप गुंजाळ, विलास शेळके, विवेक कुलकर्णी, सुजित कुमावत, अविनाश कुलट, सुचित शिंदे, तारगे आदि कार्यरत होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा