मंदिर परिसरातील सुशोभिकरणामुळे नागरिकांचा धार्मिक कार्यात सहभाग वाढला - बाळासाहेब पवार; लक्ष्मीमाता मंदिर परिसर विकासकामांचा शुभारंभ


मख़दूम समाचार 
अहमदनगर (विजय मते) २३.९.२०२३
   देव-देवतांचे मंदिर उभारुन धार्मिक कार्यास चालना मिळावी मंदिराच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकते. सर्व समाज एकत्र येतो, एकात्मतेचे दर्शन यामुळे घडते. केवळ मंदिर उभारुन चालत नाही, त्याच्या आजुबाजूला झाडी, बैठक व्यवस्था, मुलांसाठी खेळणी, स्वच्छता आदि सुविधांमुळे परिसरात प्रसन्न वातावरण होते. या उद्देशाने मंदिर परिसरात सोयी-सुविधा उपलब्ध करणार. सुशोभिकरणामुळे नागरिकांचा धार्मिक कार्यात सहभाग वाढला आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी केले.
    निर्मलनगर भागात सत्कार कॉलनीतील लक्ष्मीमाता मंदिर येथील ओपन स्पेसचे सुशोभिकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी मनपा सभागृहनेते विनित पाअुलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, निखिल वारे, दिनकर गीते, विठ्ठल खेडकर, आश्रुबा पालवे, श्रीराम कुलकर्णी, उदय म्हस्के, राहुल जोधोर, चित्रा जंगले, निलिमा बडे, रुपाली मुसळे, आशाताई जायभाय, सुशिला लसगरे, सुनिता सानप, सचिन लोटके, हर्षल विधाते, प्रसाद साळी, महेश लोटके, सुमित जायभाय आदिंसह नागरिक उपस्थित होते.
      पुढे बोलतांना पवार म्हणाले की, नगरसेविका संध्याताई पवार यांच्या पाठपुराव्यामुळे चारही नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागातील बहुतेक कॉलनीमधील मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक, जेष्ठांसाठी बाकडे, मुलांसाठी खेळणी, वृक्षारोपण अशी कामे झाल्याने मंदिराची शोभा वाढली आहे. आमदार संग्राम जगताप यांचे मार्गदर्शन आम्हाला असते. त्यामुळे प्रभागात विकासकामांचा धडाका सुरु आहे, असे सांगितले.
    यावेळी विनित पाअुलबुधे, सुनिल त्र्यंबके, निखिल वारे यांनी मनोगतामध्ये नागरिकांचे मुलभुत प्रश्न ओपनस्पेसमध्ये जॉगिंग ट्रॅक, मंदिर परिसरात सुशोभिकरणाची कामे होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करतात. भविष्यात असाच विकास आम्ही चौघे करणार, असे ते म्हणाले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश भगत यांनी केले तर ऋषीकेश देवकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा