महानगरपालिका शाळेत रंगली पाककृती स्पर्धा; आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, पोषण माह सप्ताह अभियानांतर्गत स्पर्धेचे आयोजन



मख़दूम समाचार 
अहमदनगर (प्रतिनिधी) १३.९.२०२३
   येथील महानगरपालिकेच्या केडगाव उपनगरातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत विद्यार्थी पालकांसाठी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष व पोषण माह सप्ताह अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका, नाचणी, ओट या तृणधान्यांपासून व कडधान्यांपासून पालकांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले होते.
        स्पर्धेमध्ये दिपाली श्रीकांत साळवे यांनी प्रथम, काजल यशवंत पाडळे यांनी द्वितीय तर संध्या गणेश तोडमल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या दिपाली श्रीकांत साळवे यांची तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. पाककृती स्पर्धेचे परीक्षण इनरव्हील क्लब अहमदनगरच्या अध्यक्षा नंदा यादव व फिट अँड फाईन क्लबच्या संचालिका तथा मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका स्मिता उकिर्डे यांनी केले.
    मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी पाककृती स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला. सहशिक्षक शिवराज वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी रेश्मा पानसरे, पुनम बडे, शिलाबाई देसाई, लक्ष्मीकांत खोलम, करकंडे, मंदा विधाते यांची उपस्थिती होती.





Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा