प्रकाशन
मख़दूम समाचार
२३.१०.२०२३
टिपू सुलतान यांच्या वसाहतवादविरोधी संघर्षाचा इतिहास भारताच्या उभारणीत, जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा आहे. हा संघर्ष दुर्लक्षित होऊ नये. काळाच्या ओघात, सत्तेच्या दडपशाहीने दडपला जाऊ नये. म्हणून टिपू सुलतान यांच्या पाचशे पत्रांचे भाषांतर प्रकल्प संचालकांनी पाच वर्षांपुर्वी केले. प्रकल्पातील किचकटपणा, निर्मितीप्रक्रिया आणि टाळेबंदीनंतर हा प्रकल्प पुस्तकरुपात प्रकाशित होतोय. त्याचा आनंद अवर्णनीय आहे. प्रकल्पाशी निगडीत सर्वच सहकार्यांचे त्यांनी आभार मानले. विशेषत: शब्द प्रकाशनचे येशू पाटील, प्राजक्ती बक्षी, प्रकल्पात महत्वाची भुमिका असणारे म्हैसूरचे सय्यद शजीर हसन अशी कितीतरी नावे नोंदवता येतील. सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
बुकींगच्या रुपात वाचकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकल्प संपादक सय्यद शाह वाएज व सरफराज अहमद यांनी केले आहे. आगावू नोंदणी व अधिक माहितीसाठी 9820147284 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Post a Comment