मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ५.१०.२०२३
आपचे खासदार संजयसिंग यांना खोट्या आरोपाखाली अटक केल्याच्या निषेधार्थ येथील आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळा दिलेल्या निवदनात म्हटले आहे की, खासदार सिंग यांना राजकीय दबावाखाली अटक करण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे, अन्यथा आपच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी भरत खाकाळ, सिताराम खाकाळ, ॲड. विद्याताई शिंदे, दिलीप घुले, गणेश मारवाडे, राहूल तांबे, तुकाराम भिंगारदिवे, अशोक डोंगरे, लछमन सामील आदी उपस्थित होते.
Post a Comment