रयत समाचार
मुंबई (प्रतिनिधी) ५.१०.२०२३
दिल्लीतील पत्रकारांच्या घरावर धाडी टाकून काहींना अटक केल्याच्या निषेधार्थ देशभरातील पत्रकार शांततेच्या मार्गाने आंदोलने करीत आहेत. त्याचाच एक भाक म्हणून आज सायंकाळी ७ वाजता मुंबई प्रेस क्लबच्या परिसरात मुंबईत कँडलमार्च आयोजित केला आहे. पत्रकार हक्क आणि ऐक्य बळकट करण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. या आंदोलनात मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी परिषद, मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, बृहन्मुंबई पत्रकार संघ, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ, म्हाडा पत्रकार संघ आदि ११ पत्रकार संघटना सहभागी होत आहेत, अशी माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली.
إرسال تعليق