जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून जमीन मालक शेतकऱ्याने उभारला खाजगी टोल प्लाझा; कळसे टोलप्लाझा : भारतातील पहिला खाजगी मालकीचा टोलनाका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजन !


मख़दूम समाचार 
मोहोळ (प्रतिनिधी) ५.१०.२०२३
   येथील गट नं. ९२७, सिव्हिल कोर्टासमोर, कळसे नगर, पंढरपूर रोड येथील शेतकरी सुदर्शन दत्तात्रय कळसे यांनी भारतातील पहिला खाजगी मालकीचा टोलनाका उभारला आहे. आपल्या शेतातून जात असलेल्या मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी जमीन संपादित करण्यात आलेल्या परंतु त्याचा मोबदला न मिळालेल्या या जमिनीवर हा टोल प्लाझा असणार आहे. जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून आधीच्या जमीन मालकाने स्वतःचा खाजगी टोल उभारला आहे हे भारतातील एकमेव आणि पहिले उदाहरण आहे.
   याबाबतची माहिती मोहोळ येथील सुनिल माळी यांनी दिली. त्यांचे मित्र संतोष कळसे यांचे जमिनीतून मोहोळपासून मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी जमीन संपादित करण्यात आली आसून संबंधित जमीनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. म्हणून जमीनीचा मोबदला मिळण्यासाठी त्यांनी अभिनव मार्ग अवलंबला आहे तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ट्विटरद्वारे कळविले आहे.
    या टोलचे दर अगदीच रिजनेबल आहेत. तीनचाकी वाहनाला १५/- रूपये - १६०/- रूपये महिना,  चार चाकी वाहनाला १०/- रुपये - ९०/- रूपये मासिक, सहाचाकी वाहनाला ६५ /- रूपये - ४७५/- रूपये मासिक. ता. १ नोव्हेंबर २०२३ पासून पहिलाच खासगी टोल प्लाझा शुभारंभ होत असून सर्व शेतकरी बांधवांकडून या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा