अहमदनगर - पारनेर तालुक्यातील धोत्रे बु.येथील शांतिनिकेतन फार्मसी महाविद्यालयात २८ फेब्रवरी २०२४ राज्यस्तरीय चर्चासत्राचे व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. बालीरेड्डी यांनी दिली.
या चर्चासत्रा साठी प्रमुख वक्ते डॉ. मनोज तारे (सीताबाई थिटे फार्मसी कॉलेज, शिरूर), प्रा. दिपाली शेळके (नांदेड फार्मसी कॉलेज, नांदेड) व डॉ. संजय पाटील (श्रीमान सुरेश दादा जैन फार्मसी कॉलेज,चांदवड) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. जयदीप पवार यांनी दिली.
या चर्चासत्रा बरोबरच राज्यस्तरीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच डी. फार्मसी व बी. फार्मसी अशा दोन स्वतंत्र गटात राज्यातील फार्मसी विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती प्रा.राजू डहाळे यांनी दिली. सदर स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रा.राजू डहाळे (९१३०९८२८५४) यांच्याशी संपर्क साधावा.
या राज्यस्तरीय चर्चासत्रा साठी प्रा. कांचन जाधव, प्रा. प्राची देवडे, प्रा. निरंजन तिवारी, प्रा. सुयोग देवडे, प्रा. भक्ती वाघ, प्रा. विकास पळसकर, प्रा. शितल वाघमारे तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजनासाठी प्रा. विद्या पवार, प्रा. अयोध्या खेडकर, प्रा. मयुरी टाक, डॉ. प्रतीक्षा अनारसे आदी प्रयत्नशील आहेत.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर अशा या स्तुत्य उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे आणि सचिव प्रा. सोनाली शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विभाग प्रमुख प्रा. प्रियांका साबळे यांनी केले.
إرسال تعليق