देवळालीप्रवरा नगरपरिषदेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अभिवादन

देवळाली प्रवरा ता राहुरी -  देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालयात आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि लता  मंगेशकर यांना हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषदेचे ग्रंथपाल संभाजी वाळके, अग्निशमन अधिकारी  भारत साळुंखे, नंदू शिरसाठ, बाळासाहेब भोंडगे,राजेंद्र पोकळे, राजेंद्र कदम, वसुली  अधिकारी नानासाहेब टिक्कल,सोमनाथ सूर्यवंशी,दीपक भूमकर, अशोक जाधव,गोरक्षनाथ सरोदे, ज्ञानदेव सरोदे  बबन शिंदे,गोरख भांगरे व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी देवळाली प्रवरातील सर्व महिला बचत गट  पदाधिकारी व सदस्य यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा