विविध समाजात वधूवर मेळाव्यांचे पीक भरघोस आलेले दिसते. पण साई तारा मराठा वधूवर ग्रुपने मात्र मराठा समाजातील विवाहाच्या समस्यांबाबत चर्चासत्र व वधूवर मेळावा आयोजित करून समाजामध्ये संवाद निर्माण होण्याच्या दृष्टीने वेगळा प्रयोग राबविला. हा प्रयोग निश्चितच अभिनंदनीय, स्तुत्य असा आहे. विवाह ही दोन कुटुंबांना, दोन गावांना, समाजाला जोडणारी महत्त्वाची बाब आहे असे प्रतिपादन अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माहेश्वरी वीरसिंग गावित यांनी केले.
श्रीरामपूर येथील साई तारा मराठा वधूवर ग्रुपने मेन रोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात आयोजित केलेल्या मुला - मुलींचे लग्न या विषयावरील चर्चासत्र व वधूवर मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ . गावित बोलत होत्या .
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ . वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे व शिर्डी येथील माजी प्राचार्या सौ . रजनीताई रघुनाथ गोंदकर याही उपस्थित होत्या .
कार्यक्रमाच्या प्रारंभी साई बाबा यांच्या मूर्तीचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले . त्यानंतर साई तारा ग्रुपचे ॲडमिन प्रा . रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि साई तारा मराठा वधूवर ग्रुप स्थापन करण्याचा हेतू सांगितला .
आपल्या प्रमुख भाषणात प्राचार्या डॉ . गावित पुढे म्हणाल्या की , आज माणसांचा माणसांमधील संवाद कमी होत चाललेला आहे. विविध समाजात विवाहाच्या समस्या अधिक गंभीर होत चाललेल्या आहेत. आज प्रत्येक समाजात सकारात्मक संवाद अपेक्षित आहे. समाजाचे गुणदोष स्वीकारून हा संवाद सकारात्मक दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी साई तारा ग्रुपने आयोजित केलेला हा चर्चात्मक कार्यक्रम व वधूवर मेळावा खरचं कौतुकास्पद आहे असेही त्या म्हणाल्या .
चर्चासत्र प्रसंगी उपस्थित असलेल्या वधूवर पालकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ . वंदनाताई मुरकुटे म्हणाल्या की , कोणत्याही वधूवर ग्रुपमध्ये बायोडाटाची मुला - मुलाची माहिती देताना , नोंदणी करताना खरी माहिती द्यावी . काही बायोडाटामध्ये खोटी माहिती दिली जाऊ शकते.आपल्या मुला - मुलींवर संस्कार करण्याची खरी जवाबदारी ही त्यांच्या पालकांची आहे . नोकरीत असणाऱ्या सर्वच मुला - मुलींच्या अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत . त्या अपेक्षांना कुठेतरी मर्यादा घातली तर लग्न जमविण्यात कुठलीच अडचण येणार नाही असेही डॉ . मुरकुटे म्हणाल्या .
साई तारा ग्रुपच्या ॲडमिन सौ . रजनीताई गोंदकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की , बायोडाटा मध्ये मुला- मुलीं विषयीच्या अपेक्षा पालकांनी लिहिल्या तर स्थळं शोधण्यास त्याचा फायदा होतो . त्यासाठी अपेक्षा ह्या बायोडाट्यामध्ये पालकांनी लिहा व्यात . हल्ली लग्न जमविण्यात अपेक्षा ह्याच प्रॉब्लेम झाल्या आहेत. एखाद्या बायोडाट्यात अपेक्षांचा उल्लेख नसेल तर अशा स्थळाशी पालकांनी संपर्क सुद्धा करू नये असा सल्लाही प्राचार्या गोंदकर यांनी यावेळी दिला .
या वेळी मुठे वडगांव येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री वसंतराव मुठे यांनी लग्न जमवताना त्यांना आलेले अनुभव सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले .
श्रीराम थोरात, श्रीमती शालिनीताई डावखर, प्रा.बाळासाहेब बोरूडे यांनी प्रश्न विचारले तर सौ.संगिता खुळे व श्री. वाल्मिक गायधनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
या चर्चा सत्रास प्रा . रघुनाथ गोंदकर , डॉ.आनंद खरपास, पत्रकार श्री शौकतभाई शेख, प्रा . शिवाजीराव बारगळ, कृष्णा गायके, कु . गौरी बोरुडे , अशोक पिसे, हरिभाऊ मुसमाडे, राजाराम पडोळ, सागर भांड, रामहारी बोंबले आदी प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .
प्रा.रामचंद्र राऊत यांनी सूत्र संचलन केलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री संतोष जगताप पाटील,संगीत राऊत पाटील , श्रीमती मीनाताई जगताप, सौ . रेश्मा राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाच्या शेवटी सौ . रामेश्वरी लाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*संकलन:*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق