राजकीय हल्ल्यापासून वाचण्यासाठी P.K चित्रपटातील अमीर खानच्या व्यक्तिरेखेने प्रेरित झालेले माजी आमदार असिफ शेख यांनी काढलेला नवीन राजकीय पक्ष.
गलिच्छ राजकारण आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवार यांच्याशी गुप्त भेटीगाठी करणारे मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी महाराष्ट्रातील भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली स्थापन केली. (इस्लाम) Indian Secular Largest Assembly of Maharashtra. ( ISLAM )
नावाच्या राजकीय पक्षाची नोंदणी केली.
पक्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते इस्लामचा अर्थ जास्त आणि पक्षाबद्दल कमी समजावून सांगत आहेत. राजकारण एवढं नीच झालंय का? की तुम्हाला कामाच्या नावावर नाही तर इस्लामच्या नावावर मते मागायची आहेत. तुम्ही केलेली कामे लोकांना सांगा.
या राजकीय नेत्यांनी मुस्लिमांना राजकीयदृष्ट्या निरक्षर मानले आहे का?
त्यांच्या या मूर्खपणामुळे ,
मी इस्लाम पक्षाकडून बोलतोय, असे सांगून इस्लाम धर्माचा अपमान करण्याची संधी बदमाशांना दिली जात आहे का?.
उद्या राजकीय धुमाळीत केली जाणारी वक्तव्ये, आरोप प्रत्यारोप इस्लाम नावाच्या पक्षाच्या नावाने केली जाणार.
यात ' इस्लाम ' या पवित्र शब्दाची कुचबना होणार नाही का?
आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजातून हे स्वस्त राजकारण थांबवण्याची गरज आहे.
إرسال تعليق