समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे - आबीद खान

नगर - मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने केडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू  शाळा येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.व विधार्थांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. 
यावेळी मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी संविधान तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले परिश्रम आणि संविधानातील समानतेचा संदेश सुंदर व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडला.
आस्मा शेख यांनी विद्यार्थ्यां समोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.यावेळी शाळेच्या आयेशा सुलताना यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे.तो जितका मजबूत असेल तितका आपला देश मजबूत होईल.असे आबीद दुलेखान यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा