डॉ बाबा आढाव यांनी पुणे येथे सुरु केलेल्या आत्मक्लेश उपोषणाला जिल्हा हमाल पंचायत च्या वतीने निदर्शने करून जाहीर पाठींबा
नगर - पुणे येथे डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण सुरु केलेले आहे . त्यास पाठींबा म्हणून जिल्हा हमाल पंचायत येथे सल्लागार कॉ बाबा आरगडे यांच्या नेतृवाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे ,शेख रजाक ,सचिव मधुकर केकाण , रविंद्र भोसले ,अशोक सब्बन ,अशोक टीमकरे ,सतीश शेळके ,विष्णुपंत म्हस्के ,शेख अब्दुल गणी , देविदास बनसोडे ,अनुरथ कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉ बाबा आरगडे म्हणाले कि कष्टकरी चे नेते डॉ बाबा आढाव हे मागील तीन दिवसापासून आत्मक्लेश उपोषण पुणे येथील महात्मा फुले वाड्यात सुरु केले आहेत त्या उपोषणास पाठींबा म्हणून नगर जिल्हा हमाल पंचायत च्या वतीने निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. बोलताना आरगडे म्हणाले कि भारतीय संविधानाला अनुरूप आम्ही कारभार करू आणि संविधानातील समता स्वातंत्र बंधुता समाजवाद धर्मनिरपेक्षता न्याय हि मूल्ये देशात रुजवू अशी शपथ घेतलेले राज्यकर्ते हि शपथ पाळत नाही .मात्र भांडवलदारांना दिलेला शब्द पाळत त्यांच्यासाठी सर्व धोरणे राबविण्याचे काम सरकार करत आहे .त्या साठी लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचे काम राज्यसंस्था करत आहे .त्यावर आवाज उठवण्यासाठी हे आत्मक्लेश उपोषण असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment