लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचे काम राज्यसंस्था करत आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी आत्मक्लेश उपोषणास जिल्हा हमाल पंचायत अहमदनगरचा पाठिंबा

डॉ बाबा आढाव यांनी पुणे येथे सुरु केलेल्या आत्मक्लेश उपोषणाला जिल्हा हमाल पंचायत च्या वतीने निदर्शने करून जाहीर पाठींबा  

नगर -  पुणे येथे डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण सुरु केलेले आहे . त्यास पाठींबा म्हणून जिल्हा हमाल पंचायत येथे सल्लागार कॉ बाबा आरगडे यांच्या नेतृवाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे ,शेख रजाक ,सचिव मधुकर केकाण , रविंद्र भोसले ,अशोक सब्बन ,अशोक टीमकरे ,सतीश शेळके ,विष्णुपंत म्हस्के ,शेख अब्दुल गणी , देविदास बनसोडे ,अनुरथ कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना कॉ बाबा आरगडे म्हणाले कि कष्टकरी चे नेते डॉ बाबा आढाव हे मागील तीन दिवसापासून आत्मक्लेश उपोषण पुणे येथील महात्मा फुले वाड्यात सुरु केले आहेत त्या उपोषणास  पाठींबा म्हणून नगर जिल्हा हमाल पंचायत च्या वतीने निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.  बोलताना आरगडे म्हणाले कि भारतीय संविधानाला अनुरूप आम्ही कारभार करू आणि संविधानातील समता स्वातंत्र बंधुता समाजवाद धर्मनिरपेक्षता न्याय हि मूल्ये देशात रुजवू अशी शपथ घेतलेले राज्यकर्ते हि शपथ पाळत नाही .मात्र भांडवलदारांना दिलेला शब्द पाळत त्यांच्यासाठी सर्व धोरणे राबविण्याचे काम सरकार करत आहे .त्या साठी लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचे काम राज्यसंस्था करत आहे .त्यावर आवाज उठवण्यासाठी हे आत्मक्लेश उपोषण असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा