निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी आळंदी (देवाची) येथे आठवे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी दिली.
वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या आणि पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे आठवे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन देवाची आळंदी येथे देविदास धर्म शाळेत दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केले आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्रीधर महाजन हे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, पर्यावरण तज्ज्ञ व निवृत्त जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे, डब्ल्यू ई चांगुलपणाच्या चळवळीचे संस्थापक राज देशमुख, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर हे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या समारोप समारंभ प्रसंगी पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी ॲड. प्रभाकर तावरे व आळंदी देवस्थानचे अध्यक्ष निरंजनशास्त्री कोठेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. समारोपापूर्वीच्या दुपारच्या सत्रात क्षेत्रभेटीचे आयोजन केलेले आहे. या संमेलनामध्ये असंख्य पर्यावरण स्नेहीनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमोददादा मोरे, सचिव वनश्रीताई मोरे-गुणवरे व मंडळाचे पदाधिकारी छायाताई रजपूत, लतिका पवार, तुकाराम अडसूळ व संमेलन संयोजन समितीने केले आहे. या संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक, पत्रकार धीरज वाटेकर हे करणार आहेत. या संमेलनाच्या नाव नोंदणीसाठी डॉ. शरद दुधाट, ९८३४१३२१३८ यांच्याशी संपर्क साधावा, असे मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी सूचित केले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट- श्रीरामपूर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق