रयत शिक्षण संस्थेच्या डी डी कचोळे माध्यमिक विद्यालयामध्ये देशाचे माझे कृषिमंत्री,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक सुनील साळवे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर सर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मीनाताई जगधने विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की जीवनात धाडसी बना, योग्य निर्णय घेण्याची क्षमता खेळामुळे विकसित होते, खेळामुळेच नेतृत्व कौशल्य विकसित होते. सहकार्यवृत्ती, सहनशीलता, खिलाडूपणा, दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता खेळ व बाजारातील खरेदी विक्रीच्या अनुभवातून हे कौशल्य विकसित होतात. शरद पवारांचे व त्यांचे स्वतःचे बालपणातील अनुभव, आई बद्दलची प्रेम, आपुलकी, माया याबरोबरच धाडसी बनण्याचे संस्कार यामुळे शरद पवार यांचे व्यक्तिमत्व घडत गेले हे विद्यार्थ्यांना सांगितले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाची भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता याबद्दल मीनाताई जगधने यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, संगीत खुर्ची व इतर मनोरंजक खेळ विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सव उपक्रम आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले तर पर्यवेक्षक बाळासाहेब यांनी उपस्थितांची आभार मानले.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
Post a Comment