"वृत्तनगरी"स PRGI क्र. मिळाल्या बद्दल संपादक जावेदभाई शेख यांचा सत्कार

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद एस. शेख संपादित वृत्तनगरी या वर्तमानपत्रात गत वर्षभरापासून विविध विषयांकित समाजाभिमुख लेख, बातम्यांना वृतनगरी या वर्तमानपत्र अंकाद्वारे सातत्याने प्रसिद्धी दिली जात आहे, वर्तमानपत्राची नियमित सातत्य टिकवत सदरील अंकात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांसह जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न आणि समस्यांना उजाळा दिला जात आहे, यामध्ये संपादक जावेद एस.शेख यांचे मोठे परिश्रम असल्याने नुकताच वृतनगरी या वर्तमानपत्रास पीआरजीआय रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाल्याने त्यांचा परिश्रमास यश प्राप्त झाले आहे. 
भारत सरकार प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या प्रेस रजिस्ट्रार  जनरल ऑफ इंडिया (PRGI) (पुर्वी ज्यास आरएनआय असे म्हटले जायचे) या कार्यालयाकडून वृतनगरी या वर्तमानपत्रास पीआरजीआय रजिस्ट्रेशन क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या हस्ते समता कार्यालयात संपादक जावेद शेख यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शौकतभाई शेख यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडून त्यांच्या भावी उज्वल कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख म्हणाले की, वर्तमानपत्र चालवणे ही तारेवरची कसरत आहे हे नाकारुन चालणार नाही,आजच्या सोशल माध्यमांच्या युगात वृतनगरी या वर्तमानपत्राने प्रिंट मिडिया क्षेत्रात आपले सातत्य टिकवून धरले असल्याने त्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे, यापुढे देखील असेच सातत्य टिकवत पुढील वाटचाल करावी असेही ते म्हणाले.
याप्रसंगी ॲड.मोहसिन शौकत शेख, तहसीन पांडे, वृक्ष संवर्धन चे संपादक शब्बीर उस्मान शेख,राज प्रसारित चे संपादक राजु मिर्झा, सामाजिक कार्यकर्ते भगवंतसिंग बत्रा आदि मान्यवर उपस्थित होते.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा