श्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील मौजे कोन्ची येथील स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीधर भोसले यांनी सामाजिक उपक्रमार्गत  संपुर्ण महाराष्ट्रात ख्रिस्ती व इतर अल्पसंख्यांक समाजाचे १५१ वधू-वर मेळावे आयोजित करून असंख्य विवाह जुळवून विक्रम केल्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची विशेष दखल घेवुन श्रीरामपूरच्या ब्रदरहुड सोशल सेंटरने श्रीधर भोसले यांना बाभळेश्वरच्या बाळ येशू चर्च मधे ख्रिस्ती समाज भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सेक्रेटरी पी. एस. निकमसर, फादर मायकल वाघमारे, फादर संजय पंडीत, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. शैलजा ब्राम्हणे/साबळे, पिटर बारगळसर, साकुरी चे उपसरपंच सचिन बनसोडे, बाळासाहेब ब्राम्हणे, मायकल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. निमीत्त होते,
 १५५ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे फादर मायकल यांच्या शुभहस्ते उद्गघाटन झाल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, औरंगाबाद इथुन आलेल्यांची १५० हून अधिक उपस्थिती दिसून आली. बाळासाहेब ब्राम्हणे यानी प्रास्ताविक केले तर संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा