४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर राजु मंजू जाधव सेवानिवृत

४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर
राजु मंजू जाधव सेवानिवृत 

राजू जाधव सेवापुर्ती समारंभ उत्साहात संपन्न 
विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा मोठा वर्षाव 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
खा.गोविंदराव आदिक  ग्रामीण शिक्षण संस्था संचलित तालुक्यातील बेलापूर कंपनी हायस्कूल हरिगांव येथे दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी विद्यालयातील  सेवक राजू मंजू जाधव हे  ४० वर्षांची सेवा करून प्रदीर्घ सेवेतून सेवा निवृत झाले यानिमित्ताने सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. विमलताई पटारे या होत्या. यावेळी त्यांनी राजूमामा जाधव यांच्या कार्याचा गौरव केला.या शाळेत जाधव यांनी. इ. १ ते १०वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून याच शाळेत  सलग ४० वर्षे सेवा  अतिशय प्रामाणिक पणे पूर्ण केली .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मुख्या.  के. एस. काळे , माजी मुख्या. सौ  सुमती औताडे ,  निकम , सौ. निकम आणि शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संतोष वेताळ पा. आणि ग्रामस्थ आणि पाहुणे उपस्थित होते, विद्यालयाच्या वतीने मुख्या. झिने आर. डी. यांनी जाधव यांचे कामाचं कौतुक करतांना शांत आणि मनमिळावू स्वभाव, परिसर स्वच्छता, माजी विद्यार्थी सोबत असलेला संपर्क याबद्दल चांगले उद्गार  काढले. राजू जाधव यांनी या प्रसंगी विद्यालयातील  सर्व मुलांना छान स्नेह भोजन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब वमने यांनी केले  . सन्मानप्रत्राचे वाचन श्रीम. डांगोरकर यांनी केले. राजू  जाधव यांना सेवापुर्तीसाठी  खा. गोविंदराव आदिक ग्रा. शिक्षण संस्था चे सचिव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे महासचिव तथा राष्टीय प्रवक्ते अविनाश आदिक, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सहसचिव ऍड. जयंत चौधरी,शाळा व्य. समिती चे अध्यक्ष नितीनदादा पवार , गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हंसराज नाना आदिक, सुनील भाऊ थोरात यांनी श्री.राजु जाधव यांना त्यांच्या सेवापूर्ती व पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या.या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तथा परिसरातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
याप्रसंगी विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा