राष्ट्रीय संघर्ष समिती, अहिल्यानगर (अहमदनगर) राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे सुचनेनुसार नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचे निवासस्थानी जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करुन खासदार .लंके यांना निवेदन देवून पेन्शनवाढीची चर्चा केली.त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लोकसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार व दिल्ली आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा पारनेर तालुकाध्यक्ष यशवंत औटी,अयुबभाई शेख यांच्यासह १८/१९ जण उपस्थित होते.तसेच पूर्व सुचनेनुसार खासदार यांचे अहमदनगर येथील कार्यालयासमोर २३/२४ पेन्शन धारकांनी दोन तास धरणे आंदोलन केले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
Post a Comment