खा.निलेश लंके यांचे घरासमोर पेन्शनधारकांचे धरणे व निवेदन

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राष्ट्रीय संघर्ष समिती, अहिल्यानगर (अहमदनगर) राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे सुचनेनुसार नगर दक्षिणचे खासदार निलेश  लंके यांचे निवासस्थानी जिल्हाध्यक्ष  संपतराव समिंदर यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करुन खासदार .लंके यांना निवेदन देवून पेन्शनवाढीची चर्चा केली.त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लोकसभेच्या अधिवेशनात प्रश्न मांडणार व दिल्ली आंदोलनात  सहभागी होण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्रीगोंदा तालुकाध्यक्ष  वाळके अप्पा पारनेर तालुकाध्यक्ष  यशवंत औटी,अयुबभाई शेख यांच्यासह १८/१९ जण उपस्थित होते.तसेच पूर्व सुचनेनुसार खासदार यांचे अहमदनगर येथील कार्यालयासमोर २३/२४ पेन्शन धारकांनी दोन तास धरणे आंदोलन केले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा