कळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांनी बालआनंद मेळाव्यात जीवनातील व्यवहारिकज्ञान, बौद्धिक खेळ, तणावमुक्त व आनंददायी खेळाचा आनंद घेतला.
बालआनंद मेळाव्याचे उदघाटन सरपंच राजेंद्र गवांदे यांचे हस्ते व गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ,ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, सीताराम वाकचौरे, संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे आदींच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
बालआनंद मेळाव्यात ४५ खाद्य स्टॉल,२५ भाजीपाला स्टॉल, ८ बौद्धिक खेळ असे एकूण ७८ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये एकूण उलाढाल २८७९२/- रुपये इतकी झाली. भेळी च्या स्टॉल वर गर्दीची झुंबड उडाली होती.
यावेळी अगस्ती देवस्थान चे विश्वस्त विष्णू महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, देवराम महाराज वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, आनंदराव वाकचौरे, अशोक ढगे यांची भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, शिक्षण विस्तार अधिकारी माधव हासे, केंद्रप्रमुख शकील बागवान (सर), शिक्षक मुख्याध्यापक टी.के, वाजे, संगीता दिघे,संपत भोर, योगेश थोरात, माधवी गोरे, हर्षल सोनवणे, वाय. इ. सय्यद,के.पी. भागवत,सपना गुरव, सुवर्णा जाधव, श्रीमती पी.एस. सूर्यवंशी, वृषाली बर्वे, कविता गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्रान सय्यद, सौ. मनीषा वाकचौरे, सौ. गीतांजली वाकचौरे यांनी विशेष प्रयत्न केले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे - अकोले
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment